शेगाव, बाळापूरमध्ये भूकंपाचे धक्के

भूकंपाचे धक्के  

बुलडाणा -जिल्ह्यातिल  शेगावमध्ये आणि  अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी ६.30 च्या सुमारास  भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापन  रिश्टर स्केलवर २.९ इतक्या तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे.

हा भूकंप २०.८३ अक्षांश व ७६.८३ रेखांश दरम्यान १० कि.मी. खोलीवर जाणवला. सदर माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली. सुदैवाने भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे अद्यापपर्यंत तरी कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाने स्पष्ट केले आहे.