फुलचंदराव कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश

कमळ चिन्हाला सोडचिट्टी देत फुलचंद कराड यांनी घेतली हातत तुतारी

बीड /परळी/वैजनाथ- प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. हा जाहीर प्रवेश सोहळा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये संपन्न झाला आहे. भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात शरद पवार साहेबांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, खा. नरेंद्रजी पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेशजी टोपे यांची उपस्थिती होती.

भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे लोकनेते गोपीनाथराव मुंडे भक्तांना विचारात घेतले जात नाही असा आरोप फूलचंद कराड यांनी कालच प्रसिद्धी स दिलेल्या पत्रकात केला होता. काही वर्षा पासुन भाजपच्या कुठल्याच कार्यक्रमात फुलचंद कराड सहभागी होत नव्हते किंवा करुन घेतले जात नव्हते अशा बाबत भाजपावर नाराजी व्यक्त करत आज मुंबई येथे खा. शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. असुन शरद पवार गटाकडुन बीड लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता फुलचंद कराड यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.