◾न्याय व्यवस्था : सर्वोच्च न्यायालय, निरक्षण .
◾दोषींना दोषी ठरवले पाहिजे. गुन्ह्याची चौकशी निष्पक्ष व प्रभावी दोन्ही झाली पाहिजे.
नवी दिल्ली- वृत्तसंस्था-गुन्हा घडून अधिक कालावधी उलटून ही उकल न झालेले गुन्हे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी स्थाफ्न संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी करतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने ११ वर्षांपूर्वी मणिपुरी तरुणीं’ एएस रिंगमफीच्या (वय २५) मृत्यू प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकाल रद्द केला.
सदर मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्या. जेके माहेश्वरी आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या पीठाने सांगितले की, हे प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचे प्रकरण वाटत नाही. गुन्ह्याच्या ठिकाणी फरशीवर रक्त सांडले होते. हे हत्येसारखे दिसते. त्यामुळे दोषींना दोषी ठरवले पाहिजे. गुन्ह्याची चौकशी निष्पक्ष व प्रभावी दोन्ही झाली पाहिजे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250123-WA0006.jpg)