बंगळुरू पाण्याचा गैरवापर; २२ कुटुंबांना प्रत्येकी ५००० रुपये दंड

◾भीषण पाणी टंचाई/भयाण वास्तव- गत ५०० वर्षांतील सर्वांत मोठे जलसंकट.

बंगळुरु : देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेलेल्या बंगळुरूत ५०० वर्षांतील सर्वांत मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बंगळुरू पाणीपुरवठा मंडळाने पाण्याचा गैरवापर करणाऱ्या २२ कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ते पिण्याचे पाणी कार धुण्यासाठी आणि बागकामासाठी वापरत होते.

कार, कपडे धुण्यासाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर मंडळाने दोन आठवड्यांपूर्वी बंदी घातली होती. याबाबत कारवाई करत मंडळाने २२ कुटुंबांकडून एकूण १ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्व २२

कुटुंबे बंगळुरूच्या विविध भागातील आहेत; परंतु सर्वाधिक दंड (८० हजार) शहराच्या दक्षिण विभागातून वसूल करण्यात आला आहे.का वेरी नदी आणि बोअरवेलचे पाणी होळीसाठी वापरू नका, असा सल्लाही मंडळाने दिला होता. पूल पार्त्या आणि रेन डान्समध्ये पाण्याचा गैरवापर होत असल्याचे मंडळाने म्हटले आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे, बंगळुरूमधील सुमारे १.४ कोटी लोकसंख्येला पर्यायी उपाय शोधणे भाग पडले आहे. शहरातून अनेकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दुसरीकडे, ज्यांना घरे घ्यायची होती त्यांनी आपले विचार बदलण्यास सुरुवात केली आहे.