तापमान ४२.५ अंश, भुसावळ देशामध्ये सर्वाधिक उष्ण

भुसावळर्चे तापमान ४२.५ अंशांवर देशामध्ये सर्वाधिक

बीड ४०.३ सह राज्यात अनेक शहरांत पारा ४० च्या वर

जळगांव – भुसावळ –केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयातील नोंदीनुसार सर्वात उच्च तापमानाची नोंद  भुसावळला मंगळवारी कमाल ४२.५ अंश तर किमान २८.२ अंशाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भुसावळसह तब्बल १३ शहरांतील पारा चाळिशीपार होता. अकोल्यात उच्चांकी ४१.५ तर मालेगावी ४१ तापमान होते. देशाच्या अन्य भागात मंगळवारी भूज (गुजरात) ४१.६, राजकोट (गुजरात)- ४१.१, सुरेंद्रनगर (गुजरात)- ४१, नड्याल (आंध्रप्रदेश) – ४०.९ अंश. तापमान होते.

दरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.  अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आर्द्रता येत आहे. त्यामुळे कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होत आहे. २८ ते ३१ मार्चदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने दिला आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पुढील तीन दिवसांत खान्देशात कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ४३ अंशांच्या वर राहू शकेल. यासोबत एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ४४ अंशांपेक्षा अधिक राहील. यानंतरही तापमानात चढ-उतार आहे.