संग्रहित छायाचित्र
शहरातील अनेक बोर, जुन्या गावातील आड आटले. प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी शून्यावर
बीड/परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे परळी तालुक्यात जल संकट दिसून येत आहे.अनेक लघु आणि साठवण तलावांची आजची स्थिती चिंताजनक आहे. परळी तालुक्यातील मुख्य जलशोत्र म्हणून नागापूर येथील वाण धरण अतिशय महत्त्वाचे आहे. चोरून पाणी उपसा करत आहेत त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. जेव्हा पाणी प्रश्न उद्भवतो, दुष्काळी जल संकटाची स्थिती निर्माण होते त्याप्रसंगी प्रशासनाने अशी कारवाई केली आहे. परंतु आता राखीव पाणी लपवून चोरून उपसा होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे .
१४ मार्च च्या उपलब्ध माहिती नुसार प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणी साठा सुमारें ५९.९४% आहे. तालुक्यातील ईतर लघु आणि मध्यम साठवण तलाव एप्रिल मध्या पर्यन्त कोरडे पडू शकतात. त्यामुळे परळी शहरासह एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाळा येईपर्यंत सुमारे अडीच महिन्याचा कालावधी आहे , पाणी काटकसरीने वापरून पशु आणि नागरिक यांची गैरसोय टाळायची आहे. तालुक्यातील नागरिकांनी सध्या उपलब्ध असलेले पाणी नियोजन करून वापरावे अशी ही काही जेष्ठ मंडळींची मानसिकता आहे.
परळी तालुक्यातील मध्यम व लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडत आहेत. अनेक मध्यम व लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर येऊन ठेपला आहे.येणाऱ्या काळात पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावण्याची शक्यता आहे.