दिलीप वळसे-पाटील पाय घसरून पडले

पाठीला दुखापत, काही दिवस विश्रांतीचा सल्ला 
पुणे /मंचर : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील बुधवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास लाईट चालू करण्यासाठी गेले असता टी पॉयला अडखळून ते  आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडल्याची माहिती मिळते आहे. पडल्याने त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गरज पडल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली असून त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अजित पवार गटाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र वळसे-पाटील यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे .