एक तोळा सोन्या साठी रु. ७४ हजार भाव

संग्रहित छायाचित्र

🔷 बाजार भाव ६६ हजार ३५० रुपये अधिक घडणावळ अधिक कर 
🔷 राजधानीत  सुमारे १०० किलो सोन्याची  मोड बाजारात येत असून खऱ्या अर्थाने काही जन सोने कॅश करत आहेत. 

नवी मुंबई :  काही वर्षापूर्वी  एक तोळा सोन्यास सुमारे ५० हजार रुपये लागायचे. मात्र आता सोने  खरेदी करणे सामन्याच्या  आवाक्या बाहेर गेले आहे. मुंबई मध्ये गुरुवारी एक तोळे सोन्याचा भाव ७४ हजार ३४० रुपये इतका होता. प्रत्यक्षात सोन्याचा एक तोळ्याचा भाव ६६ हजार ३५० रुपये एवढा असून जीएसटी आणि घडणावळ मिळून हा भाव ७४, हजाराच्या पुढे जात आहे.

सततच्या वाढणाऱ्या दर मुळे  सराफ बाजारातील विक्रीही काही प्रमाणात कमी झाली आहे. काही जण सोने विकत आहेत तर काही जुन्या चे नवे दागिने बनवून घेत आहेत.  मुंबईत दररोज सुमारे १०० किलो मोड सराफ बाजारात येत असल्याच चित्र आहे.  सोन्याला आलेली तेजी पाहता आता  सर्वसामान्य कुटुंबियांना लग्नसराईसाठी
सोने खरेदी करणे अशक्य बनले आहे. याचाच परिणाम म्हणून सोने खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे.