◾काँग्रेसला मोठा धक्का
लातूर : राज्यात राजकीय घडामोडी वेगाने होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर शनिवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, डॉ. अर्चना यांनी अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
बदलत्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्यातील अनेकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा विविध सामाजिक माध्यमांमधून होत होती. त्यात चाकूरकर परिवारातील डॉ. अर्चना पाटील यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.