🔹प्रकृतीचे कारण, श्रीनिवास पाटील यांची माघार,
साताराः साताऱ्याचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली आहे.
त्यानी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना हे कळविली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. या वेळीही साताऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार संधी देतील असे अंदाज बांधले जात होते. आता प्रकृतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

