डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाण्यासाठी मध्यरात्री विद्यार्थिनिं कुलगुरूंच्या बंगल्याचा दारी

समस्या – विद्यापीठात पाण्याचा ठणठणाट 
संभाजीनगर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या वस्तीगृहात दोन दिवसापासून पाणी नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या बंगल्यासमोर मध्यरात्री दोन तास आंदोलन करून तीव्र घोषणाबाजी केल्याची घटना घडली.विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर कुलगुरूंना तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी लागली.
मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या विद्यार्थीनींनी विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले,परिणामी ऐन मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थीनींनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला व तब्बल दोन तास रिकाम्या बादल्या घेऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
प्रथम कुलगुरूंच्या बंगल्याच्या गेट समोर येऊन आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींची कुलगुरूंकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थीनींनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात विद्यार्थीनींनी घोषणां दिल्या
प्रत्यक्ष कुलगुरू येऊन विद्यार्थिनिंशी चर्चा करत नाहीत आणि वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून दिले जात नाही तो पर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच चालूच राहील अशी आक्रमक भूमिका विद्यार्थीनींनी घेतल्यानंतर कुलगुरूंनी प्रत्यक्ष येऊन मुलींशी चर्चा केली. व कर्मचाऱ्यांना  वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.