आप चे मंत्री कैलाश गेहलोत ED कार्यालयात

मध्य धोरण/ईडी

मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठवले होते समन्स,

वृत्तसंस्था/नवी दिल्ली – मद्य धोरणं प्रकरणांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता ईडीने त्यांचे सहकारी आणि मंत्री नजफगडमधील आपचे आमदार कैलाश गेहलोत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. गेहलोत शनिवारी साडेअकरा वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. गेहलोत हे केजरीवाल सरकारमध्ये ते परिवहन, गृह आणि कायदा मंत्री आहेत.

तपास एजन्सीचे म्हणणे आहे की, गेहलोत 2021-22 साठी मद्य धोरण तयार करणाऱ्या मंत्र्यांच्या गटाचा भाग होते. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी नगरविकास मंत्री सत्येंद्र जैन यांचाही समावेश होता.एजन्सीने आरोपपत्रात गेहलोत यांचे नाव घेतले होते. ईडीचा आरोप आहे की, मद्य धोरण साऊथ लॉबीला लीक केले गेले होते, ज्यामध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कविता यांचाही समावेश होता. साउथ लॉबीवर आप आणि त्यांच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

अटकेचा क्रम असा आहे.. या प्रकरणी मुख्यमंत्री  केजरीवाल यांच्यासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे.तर’आप’ नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना यापूर्वीच ईडीने मद्य धोरण प्रकरणात अटक केली आहे. सद्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. के. कविता यांना 15 मार्चला तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती. सध्या केजरीवाल 1 एप्रिलपर्यंत तर कविता 9 एप्रिलपर्यंत रिमांडवर आहेत.