परळी शहरा नजीकचा चांदापुर तलाव कोरडा 

परळी तालुक्यातील ४ लघु प्रकल्प कोरडे; पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर ,

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – मागच्या वर्षी  पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे परळी तालुक्यात मोठे जल संकट समोर येत आहे.दह  लघु आणि साठवण तलावांची आजची स्थिती चिंताजनक आहे.  परळी  पाणी प्रश्न, दुष्काळी जल संकटाची स्थिती निर्माण  झाली आहे. दहा लघु प्रकल्पा पैकी ४ प्रकल्प कोरडे पडले तर दोन प्रकल्प येत्या आठ दिवसात कोरडे पडतील

शहरा  नजीकचा चांदापुर तलाव कोरडा पडल्याने त्या खाली येणार शहरातील जुना गाव भाग प्रभावित झाला असून जुन्या गावातील अनेक आड ,विहिरी, बोर कोरडे पडले आहेत. पाणी टंचाई मुळे  नागरिक हवालदिल झाले आहेत. न प च्या नळाला आठ दिवसातून एक किंवा दोनदा पाणी येत असून तेही कमी दाबाने आहे. पाणी येण्याच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होणे ठरले आहे.

शहरातील  जूना  गावभाग,जलालपुर, वंडर कॉलणी पावरलूम ,शिवाजीनगर भागात पाणी प्रश्न भेडसावत आहे .

परळी तालुक्यात भीषण पाणी टंचाईल सुरवात झाली असून वाण प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणी साठा सुमारें ५०  % आहे. तालुक्यातील ईतर लघु आणि मध्यम साठवण तलाव मार्च  अखेरीस कोरडे पडले आहेत . त्यामुळे परळी शहरासह एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. येणाऱ्या पाउस काळाला आणखी अडीच महिन्याचा अवकाश आहे . परळी तालुक्यातील मध्यम व लघु मध्यम प्रकल्प  कोरडे  पडत आहेत. अनेक मध्यम व लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर येऊन ठेपला आहे.येणाऱ्या काळात पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावण्याची शक्यता आहे.

कोरडे पडलेले लघु मध्यम प्रकल्पाची दयनीय अवस्था टक्केवारी केवळ २.६७% एवढी अत्यल्प आहे.
प्रकल्पाच नाव  उपयुक्त पाणीसाठा दलघमी टक्के
चांदापुर                ०० %   कोरडा
कन्हेरवाडी             ०० %   कोरडा

खो. सावरगाव         ०० %   कोरडा
मालेवाडी              ०० %   कोरडा
गुट्टेवाडी               ० २.९४ %
मोहा                   ०९.३%