ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी
बीड/परळी वैजनाथ/एमएनसी न्यूज नेटवर्क -शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2024 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. पतसंस्थेस 74 लाख 9 हजार निव्वळ नफा झाला.
सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2024 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 38कोटी 25 लाख,कर्ज 31 कोटी 72 लाख, गुंतवणूक 13कोटी 32लाख,आर्थिक उलाढाल 130कोटी 93लाख, राखीव निधी 5 कोटी 71लाख,भाग भांडवल-69लाख 97हजार,खेळते भांडवल-48कोटी 97लाख,निव्वळ नफा 74लाख 9 हजार इतका आहे.