मैदानी खेळाच्या माध्यमातून चांगले करिअर खेळाडू घडवू शकतात- शिरीष पाटील
लखमापूर सारख्या छोट्या गावात राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल असं क्रीडा स्पर्धाचे आयोजन- धनंजय आरबुने
लातूर/रेणापूर-लखमापूर /एम एन सी न्यूज नेटवर्क:– छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण चषक लखमापूर ता.रेणापूर अंतर्गत भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 2 एप्रिल 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखमापूर चे पोलीस पाटील सोमनाथ वेदपाठक तर उद्घघाटक म्हणून माजी सैनीक शिरीष पाटील तसेच प्रमुख पाहुणे दै. आतूल्य महाराष्ट्राचे मुख्य संपादक नीतीन ढाकणे, साम टीव्ही न्युज नेटवर्क संदीप भोसले, मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक पत्रकार धनंजय आरबुने, पत्रकाराला विरोधी कृती समितीचे परळी तालुका निमंत्रक पत्रकार जगदीश शिंदे, पुण्यभूमी चे पत्रकार तथा भगवान साकसमुद्रे, सदाशिव खाडप, हनुमंत मोरे, लतीफभाई कुरेशी, मुकुंद शिनगारे , अंगद जानकर , गजू पटेल, अशोक शिंनगारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा येथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक पूर्व सैन्य सेवानिवृत्त मराठा लाईट इन्फंट्रीचे शिरीष पाटील उद्घाटनपर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या मुलांमधील मैदानी खेळ लुप्त होत चाललेले आहेत. मुलांना जास्त खेळायला वाव मिळत नाही. मुलांना पण मैदानी खेळाची जाण करून दिली पाहिजे. कोरोना काळात घरात दाबून ठेवल्या सारखी परिस्थिती होती. खेळामुळे अनेक आजारावर प्रतिकार करता येतो. खेळामध्ये कुठलेही जात धर्म वगैरे नसतो. खेळामुळे आपल्याला वेगवेगळ्या मित्रांची ओळख होते. आपल्यातले संबंध घनिष्ठ होतात. खेळामध्ये आपली क्षमता आजमावता येते. आपल्याला अशा लहान मोठ्या स्पर्धेतून परफॉर्मन्स दाखवून मोठमोठ्या स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवता येऊ शकतो. खेळामधून चांगल्या प्रकारचे करिअर खेळाडू घडवू शकतात.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार धनंजय आरबुने क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सत्राच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देताना म्हणाले की, रेनापुर तालुक्यातील लखमापूर सारख्या छोट्या गावात राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल असं क्रीडा स्पर्धाचे आयोजन खरंच क्रीडा रसिक मुलांना आनंदित करणार आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलं मुली मैदानी खेळ सोडून मोबाईल वर विविध समाज माध्यमावर व्यग्र झालेली दिसून येतात. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर करून विविध शारीरिक क्षमता आजमावणारे खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे, निश्चितच या ग्रामीण भागातील स्पर्धेमुळे पुढे अनेक युवक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील यात काही शंका नाही असेही ते म्हणाले.
सदरील क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक राज खाडप, अविनाश जानकर ,ओम खाडप, विनोद गंडले, दिपक खाडप,नारायण धायगुडे,सूरज खाडप, सुमित खाडप, अक्षय खाडप, महादेव खाडप,अशोक खाडप, तानाजी खाडप, गणेश खाडप,दयानंद खाडप, बालाजी पांचाळ,अभिषेक खाडप, यश खाडप, भाऊसाहेब खाडप,अनंत जाधव,नेताजी खाडप, नेताजी राठोड,अर्जुन ससाणे,रामदास ससाणे, बंडू खाडप, व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
🔶बक्षिसांची खैरात:
छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण चषक लखमापूर येथे भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महेश शिवाजी खाडप यांच्या वतीने प्रथम पारितोषिक 51 हजार व द्वितीय पारितोषिक अविनाश बाबुराव जानकर 31 हजार तर तृतीय पारितोषिक संतोष हरिभाऊ धायगुडे 21000, तसेच चतुर्थ पारितोषिक नानासाहेब रामभाऊ खाडप 11 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे ही या स्पर्धेत ठेवण्यात आले आहेत. यात मालिकावीर 3101, उत्कृष्ट फलंदाज 2101, उत्कृष्ट गोलंदाज 2101 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट एसटी रक्षक, उत्कृष्ट झेल, वेगवान अर्धशतक अकराशे एक रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत 51 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण धायगुडे यांनी केले
🔶चौकट
पाच वर्षापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन:
गेल्या 5 वर्षे पासून छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात येते. सामाजिक कार्येक्रम, बक्षीस वितरण लखमापूर फेस्टिवल चा कार्यक्रम घेतला जातो. नामांकित कलाकार बोलावले जाते. गोर गरीब सामान्यांना विविध प्रकारे मदतीचा हात अनेक उपक्रमाद्वारे देण्यात येतो. एकंदर लखमापूर फेस्टिवलच्या या उपक्रमाचे नक्कीच करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.