🔴 अरुप पटनायक – संबित पात्रा
भुवनेश्वर- वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक ओडिशातील पुरी लोकसभा मतदार संघातून बिजू जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात उभे राहिले आहेत.
१९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राहिलेले पटनायक हे फेब्रुवारी २०११ ते ऑगस्ट २०१२ दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त होते. पटनायक यांचा लौकिक एक स्पष्टवक्ता व कडक अधिकारी असा होता.
पुरी येथे पक्षाचे चारवेळा खासदार असलेले पिनाकी मिस्रा यांच तिकिट कापून पटनायक यांना पक्षाने संधी दिली आहे. संबित पात्रा यांनी पुरीमध्ये भाजपकडून २०१९ मध्ये निवडणूक लढविली होती.