शिवमंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला

🔸भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे दुर्लक्ष

त्र्यंबकेश्वर (नाशिक) :येथील प्राचीन स्वयंभू शिवपिंडीचा वज्रलेप निखळल्याने श्रद्धाळू भाविकांत चिंतेची भावना आहे . त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे.
ज्योतिर्लिंगाची होत असलेली झीज थांबवण्यास पुरातत्त्व सर्वेक्षण विभागास अपयश आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाने दि. ५ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान पाच दिवस मंदिर पूर्ण बंद ठेवून पिंडीच्या पाळेची झालेली झीज वैज्ञानिक पद्धतीने वज्रलेपाने भरून काढली होती.हा वज्रलेप केल्याने पिंडाची झीज होणार नाही, वज्रलेप निखळणार नाही, असा दावा या विभागातर्फे करण्यात आला होता.