नवी मुंबई बाजारात लिंबाला मोठी तेजी

बाजारांत एक लिंबू ५ – ६ रुपयांना विकले जात आहे.

नवी मुंबई : राज्यात उन्हाचा पारा चढतो आहे तस तापमान वाढू लागले आहे. उन्हाळ्यात अल्हाददायक वाटणारे लिंबू पाणी ,यामुळे बाजारात लिंबूला मागणी वाढली आहे. मुंबई मध्ये कालच्या मंगळवारी ७० ते ८० टन लिंबाची आवक झाली आहे. लिंबूचे बाजारभावही तेजीत आहेत

मुंबई बाजार पेठेत साधारण आंध्राकडून अधिक लिंबाची आवक होत असते लिंबू बाजारभाव २५ ते ४० रुपये किलोवरून ४० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. उकाडा वाढल्याने लिंबांचे दर वाढल्यानंतरही ग्राहकांकडून लिंबूची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. उन्हाळ्याचे पुढील दोन महिने बाजार दर तेजीतच राहणार असल्याचे अंदाज बांधता येतो.