🔶 आज दुपारी चार वाजता होणार अंत्यसंस्कार
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-
शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर हरेगावकर यांचे आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले , मृत्यू समयी ते 65 वर्ष वयाचे होते.
गुरुकृपा नगर येथील रहिवासी , व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर सोपानराव हरेगावकर यांचे आज सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने ते सर्व परिचित होते. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे केली होती. वीरशैव समाजाच्या विविध धार्मिक, सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, तीन भाऊ, एक बहीण, नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान आज दि ३ एप्रिल रोजी कमलाकर हरेगावकर यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.