पंकजाताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

बीड येथे प्रचारासाठी येणार असल्याचे आठवलेंनी केले मान्य

मुंबई ।दिनांक ०३।– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांची काल भाजपा राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले.
पंकजाताई मुंडे यांनी मंगळवारी ना. रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी आठवले परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पंकजाताईंच्या प्रचारासाठी आपण आवर्जून बीड येथे सभा घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आठवले व मुंडे साहेब यांच्यात अतिशय चांगली मैत्री होती .आमच्या नेहमीच भेटीगाठी व संवाद होतो. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी मुद्दाम त्यांना भेटायला आले. या निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
••••