७  एप्रिल व १०  एप्रिल रोजी मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान रद्द.

नांदेड- श्री गंगानगर रेल्वेचे काही थांबे बदलले

नांदेड –७ आणि १० एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान मराठवाडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. धर्माबाद- मनमाड, मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रमांक (17688) ही दि. ७ आणि १० एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड -एरोड विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली असून , नंदिग्राम एक्सप्रेस दादर पर्यंत धावणार आहे. ९ एप्रिल ची औरंगाबाद- हैदराबाद एक्सप्रेस वेळेवर सुटणार आहे. आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस गाडी क्रमांक (11402) १ ते २८ एप्रिल दरम्यान दादर पर्यंत धावणार असून दादर ते मुंबई सीएसटी दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
पूर्वी घोषित केलेली औरंगाबाद- हैदराबाद एक्सप्रेस गाडी क्रमांक (17 650) ९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून उशिरा सुटण्याचे कळवले होते मात्र ती वेळेवर सुटेल, तसेच नांदेड ते एरोड गाडी क्रमांक (07189) या विशेष गाडीला ५ एप्रिल ते २८ जून दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. एरोड ते नांदेड गाडी क्रमांक (07190) विशेष गाडीला ७ एप्रिल ते ३० जून दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे.

नांदेड श्री गंगानगर रेल्वेचे काही थांबे बदलले

नांदेड विभागातून धावणारी उत्तर रेल्वे मधील लाईन ब्लॉकमुळे नांदेड- श्री गंगानगर, श्री गंगानगर -नांदेड या रेल्वे गाड्यांचे काही थांबे वगळण्यात आले आहेत, त्यामुळे काही रेल्वे स्थानकावर या गाड्या थांबणार नाहीत.

नांदेड -श्री गंगानगर गाडी क्रमांक (12439) ही 28 एप्रिल रोजी नांदेड-श्री गंगानगर सुपर फास्ट गाडी क्रमांक (12485) २५  आणि २९  एप्रिल रोजी जाखल, माणसा, भटिंडा मार्ग जाईल.  संगरूर, धुरी, बनाला, रामपुरापुल हे थांबे या गाडीसाठी वगळण्यात आले आहेत. तसेच श्री गंगानगर-नांदेड गाडी क्रमांक (12486) ही गाडी २७  आणि ३०  एप्रिल रोजी श्री गंगानगर -नांदेड गाडी क्रमांक (12440) 26 एप्रिल रोजी भटिंडा, मानसा, जाखल, मार्गाने जाईल. रामपुरा पुल, बरणाला, धुरी संग्रुर हे थांबे यासाठी वगळण्यात आले आहेत. नांदेड- श्री गंगानगर गाडी क्रमांक (12439) ७, १४  आणि २१  एप्रिल रोजी हडिया, श्री गंगानगर -नांदेड (12440) ५ , १२  आणि २९  एप्रिल रोजी लेहरा, मोहब्बत, नांदेड- श्री गंगानगर गाडी क्रमांक (12485) ४ , ८ , ११ , १५ , १८  आणि नंतर २२  एप्रिल रोजी हडीया, श्री गंगानगर- नांदेड (12486) ६ ,९ ,१३ , १६ , २० आणि २३  एप्रिल रोजी लेहरा, मोहब्बत,या ठिकाणी पर्यायी तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.

अधिक माहिती साठी व झालेल्या बदला साठी नांदेड स्थानकाशी संपर्क करून खात्री करावी