बीडमध्ये भाजपा महायुतीचे जिल्हा प्रचार कार्यालय ; पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लोकसभा २०२४

बूथ प्रमुखांसह सुपर वॉरियर्ससोबत पंकजाताईंनी घेतली बैठक

बीड- भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बीड येथील जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात झाले. खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बीड शहरातील जालना रोडवरील संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. आता या ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने काम केले जाणार आहे. दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

पकार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, डाॅ. योगेश क्षीरसागर, बबनराव गवते, अमर नाईकवाडे
आदी मान्यवर उपस्थित होते.

—–
जिल्हा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड मतदार संघातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच तथा सर्व कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक कै. तुकाराम गुरूजीनगर, मस्के कन्स्ट्रक्शन प्लांट, चऱ्हाटा रोड येथे संपन्न झाली.