नवी दिल्ली – वृत्तसंस्था :चंडीगड महापौर निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांनी आपल्या वर्तनाबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडे बिनशर्त क्षमायाचना केली. खंडपीठासमोर कथितरीत्या खोटे निवेदन करणे मतमोजणीदरम्यानचे दुष्कृत्य याबद्दल न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचेही आदेश दिले होते.
व चंडीगड महापौरपद निवडणुकीचा ३० जानेवारीचा निकाल फिरवत सर्वोच्च न्यायालयाने आप-काँग्रेस आघाडीचे पराभूत उमेदवार कुलदीप कुमार यांना चंडीगडचे नवे महापौर म्हणून घोषित केले होते. मतपत्रिका बाद व्हाव्यात म्हणून मसीह यांनी आठ मतपत्रिकांवर खुणा केल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते.
न्यायालयाची बिनशर्त माफी मागत मी म्हणाले, यापूर्वीचे माझे शपथपत्र मी मागे घेईन. आधीच्या शपथपत्रात त्यांनी आपल्याला नैराश्य व चिंतेने ग्रासलेले असल्याचे म्हटले होते. ‘निवडणूक प्रक्रियेचे कथित व्हिडीओ चित्रीकरण ३१ जानेवारीला व्हायरल झाले होते. त्यानंतर राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह सोशल मीडियाद्वारे प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले.