मोकाट जनावरं रहदारीस मोठा अडथळा; जनावरांचा बंदोबस्त करण्याची संकाये यांची मागणी

नागरी समस्या ● शहरात मोकाट जनावरं वाढली,

बीड /परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क :  शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर, गल्लीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा पालिकेने  बंदोबस्त करावा,  दुचाकीस्वरांना या जनावरांमुळे अनेक अपघाताला तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील मुख्य रस्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरा सुळसुळाट झाला असून मुळे नागरिक त्रस्त होत आहेत. यामुळे शहरांतर्गत रस्त्यासह परळी अंबाजोगाई परळी गंगाखेड मार्गावरही रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याच चौकात व रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

शहरातील शिवाजी चौक ते नाथ रोड, बस स्टँड रोड, मोंढा मार्केट फळ आणि भाजीपाला बाजार या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीविक्रेत्याना ही या मोकाट जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.परळी -अंबाजोगाई या  मार्गावर अनेक ठिकाणी ही मुकी जनावरे ठिय्या देऊन बसून राहतात. शहरातील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाटसरूंना या मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  दहा- पंधरा च्या संख्येने एकत्र ही जनावरे रस्त्यात ठिय्या मारून बसल्यामुळे वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. मोठी ट्रक, चार चाकी वाहन आल्यास रस्त्यात वाहतूक कोंडी होत असून, दुचाकी आणि  पायी जाणारांना याचा मोठा त्रास होत आहे. महिला मुली वयोवृद्ध यांना रस्त्यातून जाताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.  या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मनोज संकाये यांनी केली आहे
……………………………………………..

परळी नगर परिषदेकडे रस्त्यावरील मोकाट जनावरे ठेवण्यासाठी कोंडवडा नसल्याने पालिकेकडे या जनावरांना प्रतिबंध करण्याचा कोणताही उपाय नाही.  परळी नगरपरिषदेने मोकाट जनावरांना बांधण्यासाठी आत्तापर्यंत कोंडवाडा उभारला नाही. कोंडवाड्यात बांधण्यात आलेली जनावरे जगवायची कशी? त्यांची देखभाल कशी करायची? यासाठी निधी मध्ये तरतूद करता येत नाही अशी कारणे पुढे करत नगरपालिकेने मोकाट जनावरांना परळी शहर म्हणजे अभयारण्यात जाहीर केले की काय अशी परिस्थिति दिसते.