🔶 आगामी सन आणि जयंती उत्सव / प्रशासन
बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – रमजान, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, आणि रामनवमी या सर्व सणांच्या निमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये (दि10) रोजी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत विविध सण आणि त्यानिमित्ताने मिळणाऱ्या मिरवणुका आणि संयोजन समितीचे पदाधिकारी निमंत्रित होते
या बैठकीत एसडीएम अरविंद लाटकर, परळी तहसीलचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी शहर, संभाजीनगर आणि परळी ग्रामीण याचे अनुक्रमे संजय लोहकरे, शेख उस्मान आणि मनीष पाटील हे पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार बाबुराव रुपणर यांच्यासह तिने ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, रामनवमी संयोजन समिती व रमजान ईद च्या निमित्ताने काही मुस्लिम बांधवही या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी आदर्श आचारसंहिता आणि कायद्याच्या मर्यादेत सण साजरा करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन या प्रसंगी केले. बैठकीस शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवक पत्रकार आदींची उपस्थिती होती.