सिद्धार्थ जलतरण तलाव येथे सभासदांसाठी निशुल्क एक दिवसीय CPR( cardio pulmonary Resuscitation )प्रशिक्षण शिबिर

🔷आरोग्य/सीपीआर/तातडीचे प्रथमोपचार

छत्रपती संभाजीनगर -एम एन सी न्यूज नेटवर्क-  महानगरपालिका आरोग्य विभाग व मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलाव येथे नुकतेच सभासदांसाठी निशुल्क एक दिवसीय CPR( cardio pulmonary Resuscitation ) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात आपत्कालीन जीवन वाचवणारी प्रक्रिया सीपीआर आहे,जी एखाद्याचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके बंद झाल्यावर केली जाते.

इलेक्ट्रिक शॉक, हृदयविकाराचा झटका किंवा पाण्यात बुडणे यासारख्या वैद्यकीय आणीबाणीनंतर हे होऊ शकते.सीपीआर बचाव ,श्वासोच्छ्वास आणि छातीचे दाब एकत्र करते. तंत्रशुद्ध शास्त्रोक्त पद्धतीने डॉक्टर पारस मंडलेचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी स्वतः उपस्थितीमध्ये सीपीआर चे महत्व सांगून सर्व उपस्थितांना सी पी आर चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. व सभासदांकडून सुद्धा सीपीआर चे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. याप्रसंगी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,जलतरण तलावाचे व्यवस्थापक अभय देशमुख, मेडीकव्हर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री डीपिन शहा, श्री सातपुते, जीवरक्षक व सभासद उपस्थित होते. एक दिवसीय सीपीआर प्रशिक्षण शिबिरास सिद्धार्थ जलतरण तलाव येथील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.