शेतकऱ्यांना अटकेचा परिणाम ४० रेल्वे गाड्या रद्द

🔷 किसान मजदूर मोर्चा,संयुक्त किसान मोर्चा आंदोलन

वृत्तसंस्था अंबाला : पंजाब-हरयाणा सीमेजवळील शंभू येथे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी रुळांवर बसल्याने अंबाला- अमृतसर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. हरयाणा पोलिसांनी अटक केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सुटकेची मागणी शेतकरी करत आहेत.

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (केएमएम) च्या बॅनरखाली पतियाळा शेतकरी आंदोलन करत आहेत.४० गाड्या रद्द करण्यात आल्या, तर ५४ इतर गाड्या वळवण्यात आल्या आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते पंधेर यांनी सांगितले.