बीड मध्ये धक्कादायक प्रकार- सायबर  भामट्याने वापरला पोलिस अधीक्षकांचा फोटो अन् नाव!

फसवणुक/ भामटेगिरीचे वाढलेले प्रस्थ चिंतेची बाब 

ऑनलाइन सोशल मीडिया  फसवणूक : प्रतिसाद देऊ नये, पोलिस अधिकक्षांचे आवाहन

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क- सर्वसामान्य नागरिक समाज माध्यमावरून फसले आणि फसवले गेल्याचे आपण एकले आहे. विविध कुलूपत्या वापरुन ही फसवेगीरी चालूच असते. अनेकजण या ऑनलाइन माध्यमात फसतात. बीड मध्ये मात्र या प्रकाराची हद्द झाली.   चक्क जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा फोटो आणि नाव वापरून सोशल मीडिया  फसवणूक करण्याचा प्रकार केला जात असल्याचे  या सायबर भामट्यांपासून सावध राहावे. अशा खोट्या अकाउंटला कोणीही बळी पडू नये,असे अवाहन फेसबुकवर पोस्ट टाकून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

देशभरात बँक, ओटिपी, आधार ऑफिस, गॅस एजन्सी, विमा कंपनी अशी विविध नावे वापरुन ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. या सोबतच समाजातील  प्रतिष्ठित व्यक्तीं ,डॉक्टर अधिकारी,यांचे नाव व फोटो वापरून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना मेसेज पाठविला जातो. मी खूप अडचणीत असून, मला पैशांची गरज असल्याचे सांगत पैसे उकळले जातात. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत आणि पोलिस दपत्री ते गुन्हे नोंद आहेत.

असाच प्रकार शुक्रवारीही घडला. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा फोटो व नाव वापरून समाज मध्यमावरून एकाने  काही लोकांना मेसेज केले आहेत.आपले नाव फोटो वापरल्याची माहिती स्वत: नंदकूमार  ठाकूर यांनी फेसबुक  या सोशल मीडियावर पोस्ट करून  अशा खोट्या अकाऊंटपासून सावध राहावे, त्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन केल्याचे दिसते आहे. समाज माध्यमा वरील  फसवेगीरी पासून  सावध राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे.