परळी शहरात बोरवेलला ४७ अंश तापमानचे गरम पाणी

पाणी का गरम होतेय हे अहवाल आल्या नंतरच कळेल. 

बीड/परळी- वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क  परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शिवाजी फड यांच्या बोरवेलला दि.10 एप्रिल 2024 रोजी पासून अचानकपणे गरम पाणी येत आहे. बोरवेल सुरू केले असता थोडे थंड पाणी येते त्यानंतर पाण्याचे तापमान वाढत जाऊन पाणी गरम होत जात आहे. सदरील प्रकारामुळे फड कुटुंबीय चिंतेत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की,परळी येथील शिवाजी फड यांच्या बोरिंगमधून काही दिवसापासून गरम पाणी येत आहे. या पाण्याचे गरम होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने चिंतेचा विषय बनत चालला असून भीतीचे सावट निर्माण होत आहे. सदरील बोरवेल हा 210 फूट असून 170 फुटापर्यंत पाईप टाकलेले आहेत. या भागातील अनेक बोरवेल बंद असल्याचेही समजते. याबाबत परळी तहसील प्रशासनाचे नायब तहसीलदार बी एल रुपनर यांना याविषयी माहिती दिली होती आज  भूजल सर्वेक्षण  याची शहानिशा करण्यात यावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात यावेत अशी मागणी शिवाजी फड कुटुंबाची  होती,  दरम्यान शिवाजी फड यांनी बोलताना सांगितले की गुढीपाडव्याच्या दिवशी मेघगर्जनीसह विजाचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस परळी परिसरात झाला होता. तेव्हापासून आमच्या बोरवेलला गरम पाणी येत आहे. गरम पाणी येत असल्याने आमचे कुटुंबीय चिंतेत आहे. प्रशासनाकडे याकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी आमची मागणी असल्याचेही फड कुटुंबीयांनी सांगितले होते, आज बीड येथील भूजल सर्वेक्षण विभागातील व्यक्ती दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास  फड यांच्या निवासस्थानी येऊन  त्याने त्यांच्याकडून या गरम पाण्या चे संपल घेतले असल्याची माहिती एम एन सी  न्यूज कनेक्ट ला दिली

*गरम पाण्याचे झरे आहेत का?
गरम पाण्याचे झरे आहेत का? तसाच प्रकार असावा किंवा भूगर्भात फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळे काही प्रमाणात गरम पाणी येत असल्याची संभावना जाणकारातून व्यक्त होत आहे. परळी प्रशासनाकडून अद्याप सदरील बोरवेलची पाहणी करण्यात आली नाही. प्रशासनाने त्वरित सदरील बोरवेलची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत अशी मागणी फड कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.
………………………………….
पाण्या चे संपल घेतले-दरम्यान नायब तहसीलदार बाबुरावजी रुपनर यांनक ही माहिती दिली होती आज बीड येथील भूजल सर्वेक्षण  विभागातील कोण व्यक्ती दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास  फड यांच्या निवासस्थानी येऊन  त्याने त्यांच्याकडून या गरम पाण्या चे संपल घेतले असून त्याचे तापमान ४७   होते तर त्यांच्या शेजारील बोरवेल च्या पाण्याचे ३१ असल्याची माहिती समजली. पाणी का गरम होतेय हे अहवाल आल्या नंतरच कळेल.