खर्च निरीक्षकांची केज विधानसभा मतदार संघाला भेट

बीड लोकसभा निवणूक २०२४/निवडणूक आयोग-

बीड/केज  ३९ बीड मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक सुशांत कुमार विश्वास हे मतदार संघात दाखल झाले असून त्यांनी केज विधानसभा मतदारसंघाला भेट दिली.
केज विधानसभा अंतर्गत निवडणूक खर्चचे अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्या समवेत निवडणूक खर्चाचे विविध पथके यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक, आचारसंहिता पथक, आचारसंहिता
फिरते पथक या पथकास निवडणूक खर्चाच्या व आचारसंहितेच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

केज तालुक्यातील अंतर जिल्हा बॉर्डरवरील माळेगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकास भेट दिली. बीड आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर स्थापित केलेल्या सर्वेक्षण पथकास निवडणूक निरीक्षक यांनी भेट दिली. यावेळी विविध पथकाचे नियुक्त अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच तहसीलदार केज अभिजीत जगताप आणि विलास तरंगे तहसीलदार अंबाजोगाई हे उपस्थित होते.