जहांगीर कला दालनांत “inside outside”(boundless Beauty) चित्र प्रदर्शन

🔷 कला आणि कलावंत/चित्र / चित्रप्रदर्शन/ कला दालन
🔺”inside outside” (boundless Beauty)
🔺चित्र प्रदर्शन

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क- कला रसिकांसाठी येत्या २२ तारखे पासून नामवंत जेष्ठ चित्रकार आणि दोन चित्रकर्तीचं पेंटिंग प्रदर्शनाचा शुभारंभ होतो आहे .तीन कलावांच्या पेंटिंग्ज पहाण्याची अनोखी पर्वणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे.

सोमवार मुंबई येथील जहांगीर कला दालनात जेष्ठ चित्रकार सुरेश लोणकर, व धनश्री लोणकर -रेळेकर आणि अनिता सावंत-देशपांडे यांचे पेंटिंग प्रदर्शनाचं उदघाटन मा.श्री सुहास बहुलकर, आणि मा.श्री विश्वनाथ साबळे ( डिन- जे जे स्कूल ऑफ आर्ट) यांच्या शुभहस्ते होणार आहे.

“inside outside”(boundless Beauty)
हे प्रदर्शन २८ एप्रिल (रविवार) पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहण्यासाठी खुले असेल.. कलाप्रेमी रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असं आग्रहाचे आमंत्रण… सहभागी कलावंतांनी समाज माध्यमातून ही दिल आहे. आपण ही यावे व कलेचा आस्वाद घ्यावा.. आपल्या भरभरून शुभेच्छा द्याव्यात…

🔹सुरेश लोणकर (ज्येष्ठ चित्रकार)
🔹धनश्री लोणकर रेळेकर
🔹अनिता सावंत -देशपांडे