पंकजाताई मुंडेंना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काढले परळी शहर पिंजून

🔺लोकसभा २०२४

🔶 विविध भागातील प्रचारफे-यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद_

बीड/परळी वैजनाथ, भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयात परळी शहराचे मोठे योगदान देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असुन दररोज दोन सत्रात विविध भागात प्रचारफेरी काढली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून कार्यकर्ते विविध भागात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. मतदारांचा देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

शहरात आज सकाळी विठ्ठल मंदिर जाजूवाडी,पद्मावती, इंदिरानगर, संभाजी नगर, रहेमतनगर, तुळजानगर, डॉ.देशपांडे हॉस्पिटल परिसर तर सायंकाळी शाहूनगर, रामनगर, वैद्यनाथ गल्ली, देशमुख पार, जुना पेठमोहल्ला, सुर्वेश्वर नगर, ठाकूर गल्ली, राजपूत गल्ली, भोईगल्ली आदी परिसरात प्रचार फेरी पार पडली. परळी शहरातील नागरिकांमध्ये पंकजाताई मुंडे यांना मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. पंकजाताईंच्या विजयात परळी शहराचे निश्चित मोठे योगदान असणार आहे याचा निर्धार परळीकरांनी केला आहे.आजच्या या प्रचार फेरीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी घटक पक्षाचे नेतेगण, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••