बजरंग सोनवणेंच्या अर्धांगिनी उतरल्या प्रचारात.

बीड लोकसभा २०२४

सारिकाताई सोनवणेंनी घेतली केजमध्ये महिलांची कॉर्नर बैठक.

बीड /केज : बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी प्रत्येक तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असून प्रत्येक गावात अभूतपूर्व स्वागत व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर त्यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद सदस्या सारीकाताई सोनवणे या प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी शहरातील क्रांतीनगर भागात महिलांची कॉर्नर बैठक घेतली.

बजरंग सोनवणे यांचे प्रचार दौरे सुरू असताना त्यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद सदस्या सारीकाताई सोनवणे या प्रचारात उतरल्या आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत महिला मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळविला होता. या निवडणुकीत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून केज शहरात नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १ पासून सुरुवात केली आहे. या प्रभागातील क्रांती नगर भागात महिलांची कॉर्नर बैठक घेत महिलांशी संवाद साधला.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या बजरंग सोनवणे यांनी मतदारांचा सन्मान राखण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणे  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन जास्तीत जास्त मतदारांशी कसा संवाद साधत आहेत. काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे आशीर्वाद आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे दौरे सुरू आहेत. मतदार संघातील अनेक गावात प्रचार दौरे करीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मतदारांच्या संवाद साधून त्यांनी जिल्ह्यातील संपर्क वाढवत आहेत . गावा – गावात नागरिकांकडून होत असलेले अभूतपूर्व स्वागत, महिलांकडून औक्षण आणि नागरिकांचा चांगला प्रतिसादाने त्यांचा उत्साह वाढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी तालुका निहाय झंझावाती दौरे काढून कडक उन्हात गावा – गावाना भेटी देत नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे.महिला मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांनी बजरंग सोनवणे यांना मत देण्याचे आवाहन केले. यावेळी शीतल लांडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.