🔶 प्रचंड तापमानामुळे गाड्या पेट घेत आहेत.
सिंधुदुर्ग-दोडामार्ग-राज्यांत सर्वत्रच उन्हाचा पारा चाळीशी पार झाला आहे.उन्हाळ्यात पर्यटनासाठी अनेक जण घराबाहेर पडतात. आदीकच्या तापमानामुळे दुचाकी, चारचाकी वाहने गरम होत आहेत. पर्यटनाचा आनंद घेत असह्य रणरणत्या उन्हात तिलारी घाटातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांच्या कारला घाटात अचानक आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. आग आटोक्यात आणण्याचें प्रयत्न करण्यात आले परंतु कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व जखमी झाले नाही.
उन्हाळी पर्यटनासाठी आंध्र प्रदेश राज्यातील पाच पर्यटक कारने गोव्याला आले होते. रविवारी ते तिलारी घाटातुन परतीच्या प्रवासाला निघाले होते. तापमानातील प्रचंड उष्मा आणि घाट रस्ता यामुळे अचानक आग लागून ही दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वजण – गाडीच्या बाहेर पडले.