एक दिवसीय काँक्रीट मिक्स डिझाईन वर्कशॉप.
छत्रपती संभाजीनगर : मोठ्या ध्येयप्राप्तीसाठी खूप वेदना सहन कराव्या लागतात. कष्टातून मिळविलेले यश जास्त चिरकाल टिकत असते, जेवढे मोठे स्वप्न तेवढेच मोठे यश मिळत असते.असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे (आयपीएस) यांचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय काँक्रीट मिक्स डिझाईन वर्कशॉपच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी इंडिया सिमेंटचे अजयेद्र मायाळ, ग्रामौधिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. यज्ञविर कवडे, संचालक डॉ. संतोष भोसले, प्रबंधक सचिन लोमटे, प्रा. पराग पांडे, डॉ. सौमिक मुजुमदार, डॉ उत्तम काळवणे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत अवसरमल, प्रा. वासुदेव उपाध्ये, डॉ. मधुसूदन वैद्य, प्रा. श्रुती चिटणीस, प्रा. राम चाटोरीकर, प्रा. अभिषेक जयस्वाल, डॉ. माधुरी मांगुळकर, डॉ. मोहम्मद इस्तीयाक, डॉ. सय्यद कादरी यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
पोलीस उपायुक्त श्री नितीन बगाटे म्हणाले, संताच्या प्रवचनांमधून व पोलिसांच्या कर्तव्यातून बदल घडणे अपेक्षित आहे. विद्यार्थांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. संघर्ष केल्याशिवाय यश मिळतच नाही. ज्यांना सहजासहजी यश मिळते त्यांना यश टिकविता येत नाही. जीवन एक शर्यत आहे. त्याला चटके-फटके बसले तर यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या आयुष्यात आलेली संधी ओळखता आली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता राठोड आणि जय जाधव यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. प्रशांत अवसरमल यांनी मानले.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250106-WA0011.jpg)