परळीतील  मोकाट कुत्रे झालें हिंसक; अपघात वाढले  

मोकाट कुत्रे ,जनावरे त्रासदायक 
बीड/परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क –शहरांत मोठ्याप्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली असून नगर परिषदेने मोकाट व हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्याची वेळ परळीकरावर आली आहे. श्वान दक्षता व नियंत्रण विभाग निर्माण करण्याची गरज भासतं आहे. परळीतील मोकात,आजारी, आणि हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करून शहरातील मोकाट कुत्र्यांची सरसगट नसबंदी करण्यासाठी निर्बिजीकरण मोहिम राबविण्याची नितांत आवश्यकता आहे.
 शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.शालेय विद्यार्थी, जॉगींगसाठी जाणारे नागरिक यांना प्रचंड त्रास होत आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या मागे हिंसक होऊन धावणे आदी प्रकार वाढले आहेत.त्यामुळे मोकाट कुत्र्यांची सरसगट नसबंदी करण्यासाठी निर्बिजीकरण मोहिम राबविण्यात य येणे अत्यंत आवश्यक आहे. .नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असेल तर  तक्रार दाखल करण्यासाठी तसेच आपल्या पाळीव कुत्र्याची नोंदणी करणे आणि त्याला  रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यासाठी स्वतंत्र  मोकाट कुत्रे नियंत्रण विभाग निर्माण करावा.
हिंसक झालेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाबरोबरच कोंडवाडा व डॉग हाउस निर्माण करावे याठिकाणी श्वान पकडून आणून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
       परळी शहरात अनेक भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून ,बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, स्टेशन रोड, शिवाजी चौक नाथ चित्रमंदिर, अश्या अनेक भागातील कुत्रे त्रासदायक ठरत आहेत. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.गाडी मागे धावल्याने सायकल मोटरसायकल वरील मुली, मुलं नागरिक पडल्याने जखमी होत आहेत.गणेशपार भागात तसेच अंबेवेस, गोपणपाळे गल्ली, मोंढा भागात पिसाळलेले मोकाट कुत्रे आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.