तुली रिसर्च सेंटर फॉर इंडिया स्टडीजचे सिनेमॅटिक केमिस्ट्रीचे भव्य प्रदर्शन

🔷 भारतीय संस्कृती, चित्रपट इतिहास,छायाचित्रे

नवी दिल्ली– येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेले एक अनोखे प्रदर्शन रसिकांचे मन मोहून टाकत आहे. तुली रिसर्च सेंटर फॉर इंडिया स्टडीजने  भारताच्या “सांस्कृतिक वारसा सांगणारे ‘सेल्फ-डिस्कव्हरी व्हाया रीडिस्कव्हरींग इंडिया”, नावाने हे प्रदर्शन आयोजित केले असून यात भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सिनेमॅटिक अनुभव दर्शकांसमोर सादर केला आहे.

प्रदर्शनाबाबत बोलताना नेव्हिल तुली यांनी सांगितले,  “आमचे हे प्रदर्शन भारतातील सुमारे २०० वर्षांच्या चिरस्थायी कलात्मक आणि सांस्कृतिक बंधांचा उत्सव साजरा करणारे असून यात १२० जणांनी मदत केलेली आहे.’’ नेव्हिल तुली यांनी ३० वर्षांपासून काळजीपूर्वक संग्रहित आणि जतन केलेल्या जागतिक चित्रपट इतिहासाच्या अफाट खजिन्याची केवळ एक झलक या प्रदर्शनातून समोर आली आहे. या प्रदर्शनांमध्ये छायाचित्रे, ज्युबिली ट्रॉफी आणि दिग्गज व्यक्तींमधील उल्लेखनीय सिनेमॅटिक केमिस्ट्री दर्शविणाऱ्या कलाकृतींचा एक दुर्मिळ अनुभव आहे.
प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी एक आकर्षक संग्रह स्पॉट-लाइटिंग दिग्दर्शक-अभिनेता संबंध आहे.

राज कपूर आणि नर्गिस या प्रतिष्ठित जोडीपासून ते अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई आणि यश चोप्रा यांसारख्या काही प्रमुख दिग्दर्शकांमधील अनोख्या बंधांपर्यंत आणि धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील प्रतिष्ठित नात्यांपर्यंतचा प्रवास येथे मांडण्यात आलेला होता.
टॉड ब्राउनिंग आणि लोन चॅनी, फ्रिट्झ लँग आणि थिया वॉन हार्बो, जोसेफ वॉन स्टर्नबर्ग आणि मार्लेन डायट्रिच, मार्टिन स्कॉर्सेस आणि रॉबर्ट डी नीरो, अकिरा कुरोसावा आणि तोशिरो मिफुने, यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गद दिग्दर्शक, अभिनेत्यांचाही प्रवासही या प्रदर्शनाच्या केंद्रभागी होता.
यावेळी संशोधन केंद्राच्या वेबसाइटचेही लाँचिंग करण्यात आले.

छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई