वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची – अरविंद खैरनार

🔷 परळीत सार्वजनिक आदर्श जयंतीची फुले -शाहू – आंबेडकर व्याख्यानमाला
बीड/परळीवैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पालकांनी  महात्मा जोतीबा फुले तसेच डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी यांचा आदर्श घ्यावा. पालकांनी जर नियमित पुस्तके वाचली तर मुले सुद्धा वाचनाकडे वळतील  असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील फुले-आंबेडकरी अभ्यासक अरविंद खैरनार  यांनी दि २१ रोजी वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव  समिती आयोजित फुले – शाहू – आंबेडकर व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा. डी.जे. वाघमारे हे होते. याप्रसंगी उत्सव समितीच्या वतीने फुले आंबेडकरी अभ्यास समूहाला ५००० रु ची भेट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत सत्यशोधक समाज चळवळीचे योगदान या विषयवर उदबोधन करताना खैरनार पुढे म्हणाले की, बाबासाहेबानी बुद्ध, कबीर आणि फुले यांना गुरु मानले. महात्मा जोतीबा फुले यांना त्यांच्या वडिलांनी स्कॉटीश इंग्लिश मिशनरी स्कुलमध्ये टाकल्याल्यामुळे त्यांनी थॉमस पेन लिखित राईटस ऑफ द मॅन, कॉमन सेन्स पुस्तकं व संत कबीर लिखित बिजक ग्रंथातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य, समता व मित्रता या मूल्यांवर आधारीत सत्यशोधक समाजाची निर्मिती महात्मा जोतिबा फुले केली.पालकांनी आपली मुलं घडविण्यासाठी गोविंदराव फुले व सुभेदार रामजी या आदर्श पित्यांची प्रेरणा घ्यावी.
 डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन समजून घ्यायचे असेल तर आगोदर महात्मा फुलेंनी निर्माण केलेली सत्यशोधक चळवळ समजून घेणे गरजेचे आहे. या सत्यशोधक चळवळीमुळे   कृष्णाजी केळुसकर गुरुजी, सयाजीराव गायकवाड,  छत्रपती शाहू महाराज या महान व्यक्तींचा बाबासाहेब आंबेडकरांना सहवास मिळाला. या चळवळीमुळेच बाबासाहेबांना पुढची दिशा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन वसंत कांबळे  यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.सिद्धार्थ जगतकर यांनी मानले.या कार्यक्रमास सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रा. विलास रोडे, अनिल मस्के, वैजनाथ जगतकर ,  प्रा प्रदीप बुक्तर सर, बाबासाहेब पांचांगे, अकुंश आचार्य सर, एल डी घोबाळे, एच टी वाघमारे, अजय गंडले सर, मिलिंद नरबागे, ॲड महेंद्र शिंदे ,नितीन ढाकणे, ओमप्रकाश बुरांडे ,विकास वाघमारे तसेच शहरातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,बुद्धिजीवी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.