पंकजाताई मुंडे बुधवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणूक २०२४-बीड

🔶 बीड शहरात रॅली काढून महापुरुषांना करणार अभिवादन; माने कॉम्प्लेक्स येथे होणार जाहीर सभा

बीड -दि.२२- भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे येत्या बुधवारी २४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आयोजित रॅलीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

२४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ३ वाजता पंकजाताई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत.

यावेळी रॅली काढण्यात येणार आहे. रॅली साधेपणाने असली तरी गर्दी तर मोठी होणारच आहे. रॅली माने कॉम्पलेक्स येथे पोहचल्यानंतर त्याठिकाणी सभा होणार आहे. माने कॉम्पलेक्सचे मैदान सभेसाठी कमी पडेल असं सांगतानाच पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. आपल्या विरोधी उमेदवाराच्या विरोधात घोषणाबाजी करू नका, कोणाचाही अवमान होईल असं काही करू नये, स्टेजवर जास्त गर्दी करू नये, सर्वांनी शांततेत सहभागी व्हावे असे आवाहन पंकजाताईंनी केले आहे.
••••