एस. जानकी; ‘नाइटिंगेल ऑफ साऊथ’

भारतीय प्रादेशिक संगीत /माहीतीपूर्ण /चित्रपट संगीत /सुमारे ५५ वर्ष पार्श्वगायन 

२० हजारांपेक्षा अधिक गाणी, ४ राष्ट्रीय पुरस्कार, विविध राज्यांचे ३३ पुरस्कार व सन्मान,दक्षिण भारतीय जवळपास हिन्दी , तमिळ,तेलगू कन्नड मल्यालम भाषेत गीत गायन   

चेन्नई – दक्षिण भारतात एस. जानकी नावाच्या गायिका आहेत ज्या ‘नाइटिंगेल ऑफ साऊथ’ या नावाने प्रसिद्ध आहेत.ना इटिंगेल नावाचा पक्षी आहे, जो अत्यंत मंजूळ आवाजात गातो. एस. जानकी यांचे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रिपल्ले हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील सिशत्ला राममूर्ती हे एक शिक्षक आणि आयुर्वेद औषधीचे उत्तम जाणकार होते.

एस. जानकी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, विशेषतः चित्रपट संगीताची. पार्श्वगायनात त्यांनी २० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. १९५७ मध्ये आलेल्या मगाधल नाट्टू मॅरी’ या चित्रपटातील ‘कनुक्कू नेरे….’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि त्या प्रकाशझोतात आल्या. इलिया राजा या सुप्रसिद्ध संगीतकारासोबत त्यांची कारकीर्द आणखीनच उजळली. विशेषतः इलिया राजा, एस. पी. बालसुब्रमण्यम आणि एस. जानकीया त्रिकुटांनी दक्षिण चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवून सोडला.

तरुणाईच्या आवडीचे आताचे तरुण संगीतकार ए.आर. रेहमान यांच्यासोबतही त्यांनी अल्बम केले व चित्रपटात गायनही केले. दक्षिण भारतीय जवळपास सर्वच भाषेत त्यांनी गायन केले. त्यांना ४ राष्ट्रीय पुरस्कार, विविध राज्यांचे ३३ पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले. २०१३ मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांनी नाकारला होता. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी सुमारे ५५ वर्ष गायन क्षेत्रात आहे अनेक नागरी सन्मान मला मिळाले आहेत,हा सन्मान त्यांना खूपच उशिरा जाहीर झाला होता.