परळी तालुक्यात जोरदार बरसला अवकाळी

आवकाळी  पाऊस /सखल भागात पाणी

बीड /परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क -मंगळवारी ( दि.२३) सायंकाळी सहाच्या सुमारास परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरातील ग्रामीण भागात प्रचंड स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले, त्याचे छायाचित्र, तर परळी शहरातील विद्यानगर भागात रोहित काटकर यांच्या घरानजीच्या नारळाच्या झाडावर वीज पडून त्याने पेट घेतला, यात कोणती दुखापत किंवा जीवित हानी झाली नाही.
सदर माहिती नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी दिली.