देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती ५७८५ कोटी

🔺आंध्र प्रदेश लोकसभा 2024

आंध्र प्रदेश -अमरावती :तेलगू देसम पार्टीचे  लोकसभेचे उमेदवार पी  चंद्रशेखर हे लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ५७८५  कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रातून त्यांनीही माहिती दिली आहे. पी  चंद्रशेखर हे गुंटूर मतदारसंघातील उमेदवार आहेत.

पी. चंद्रशेखर हे डॉक्टर असून त्यांनी एमबीबीएस पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतून घेतले आहे.

त्यांच्याकडे २४४८  कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे, तर पत्नी श्रीरत्ना यांच्या नावे २३४३ कोटी रुपयांची संपत्ती असून व्यवसायिक कर्ज रुपये ११३८ कोटी एवढे आहे.