उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी पंकजाताई मुंडेंनी घेतले प्रभू वैद्यनाथ व गोपीनाथगडाचे आशीर्वाद

लोकसभा २०२४ -बीड 

मातोश्री प्रज्ञाताई मुंडे व कुटुंबियांनी केले औक्षण

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-दि  २४-बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या आज परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे व गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे आशीर्वाद घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या.
परळीतील ‘यश:श्री’ या आपल्या निवासस्थानातून निघण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी नित्य पूजा करत आपले नेता व पिता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी पंकजाताई मुंडे यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाची पूजा केली व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मुलगा आर्यमन, भगिनी खा.डाॅ.प्रितमताई मुंडे,ॲड. यशश्रीताई मुंडे आदी उपस्थित होते.

गोपीनाथगडाचा घेतला आशीर्वाद:भावूक प्रसंग
————–
दरम्यान, बीड कडे जाताना पंकजाताई मुंडे यांनी सहकुटुंब गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी काहीसा भाऊक प्रसंग निर्माण झाला होता. कुटुंबाच्या आधारवड असलेल्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे या नेहमीच खंबीर असतात. मात्र आज आपली लेक राजकीय जीवनात एका नव्या अध्यायाला सुरुवात करत असताना गोपीनाथ गडावर काहीशा भावूक झाल्याचे बघायला मिळाले. गोपीनाथ गडावर दर्शन घेताना कार्यकर्ते देत असलेल्या ‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणा आणि नामनिर्देशन पत्र भरायला जाणारी आपली लेक हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता. या प्रसंगात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी व मागील काही वर्षातील राजकीय घडामोडींचा आठव मनात दाटून आल्याने प्रज्ञाताई मुंडे यांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी त्यांची पाठ थोपटत त्यांना आधार दिल्याचे बघा बघायला मिळाले.