लोकसभा २०२४ /मतदान दूसरा टप्पा
२६ एप्रिल रोजी मतदान; दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज ॥ एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र, १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार.
मुंबई : महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होत असून या प्रक्रियेसाठी मतदान यंत्रणा सज्ज आहे. या दुसऱ्या टप्प्यात अकोला, अमरावती, बुलढाणा,यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ लोकसभामतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
नकत्याच मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा,वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण १६, ५८९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे १८, ४७१ सेवा मतदारांचा समावेश आहे.
तर संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांसाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

