सुर्यकांतआप्पा समशेट्टे यांचे निधन,उद्या अंत्यविधी

दु:खद निधन  

बीड/परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)- परळी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक सुर्यकांत गंगारामअप्पा समशेट्टे यांचे गुरुवार दि.25 एप्रिल रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता विरशैव लिंगायत स्मशानभुमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
परळी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक सुर्यकांत गंगारामअप्पा समशेट्टे यांच्यावर काही दिवसापासुन लातुर येथील दवाखान्यात उपचार सुरु होते.उपचार सुरु असताना गुरुवार दि.25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्युसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते.

शहरातिल  प्रसिद्ध प्रथमेष पेपर मार्ट चे ते मालक होते. प्रिंटिंग व्यवसाईक  चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांचे बंधु होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.