🔷 नागपूर व वाशिम जिल्हाला राष्ट्रीय स्तरावर पोहचविले
नागपूर वृत्तसंस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेण्यात येणाऱ्या मुख्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्स मध्ये नागपूर मध्ये शिक्षण घेत असलेला नीलकृष्णा निर्मल कुमार गजरे हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील असणाऱ्या निलकृष्णाने या परीक्षेत शंभर टक्के परसेंटाइल मिळवत नागपूर व वाशिम जिल्हाला राष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेलखेड तालुका मंगरूळपीर या छोट्या खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा हा मुलगा असून निलकृष्णाचे दहावीपर्यंत शिक्षण कारंजा येथे झाले. नीलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. नीलकृष्णांनी पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले आणि एका खाजगी शिकवणीतून अभ्यास केला.
जेईई च्या निकालात नागपूरच्या चार विद्यार्थ्यांनी पहिला शंभर मध्ये स्थान प्राप्त केले असून यात मूळचा दर्यापूर येथील व पाच वर्षापासून नागपुरात शिक्षण घेत असलेला मोहम्मद सुफियान या विद्यार्थ्याने सोळावी रँक प्राप्त केली. यासह देवांश गटांनी याने 99.99% परसेंटाइल प्राप्त करीत ऑल इंडिया ८२ वि रँक मिळवली. तर अक्षत खंडेलवाल या विद्यार्थ्याने 90 वी रँक प्राप्त केली.
नागपूरमधून सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली होती. त्यातील 50 ते 60 टक्के विद्यार्थी पात्र ठरल्याचे माहिती मिळते आहे.