39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या; दिवशी 55 उमेदवारी अर्ज दाखल

🔷 39 बीड लोकसभा/उमेदवार
🔺आजपर्यंत एकूण 76 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले

बीड, दि.25 : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज शेवटच्या दिवशी 55 नामनिर्देशन अर्ज दाखल झाली असून आजपर्यंत एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. एकूण 76 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केली आहेत.

55 नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष सादर केले आहेत. यामध्ये समशेरखाॅं साहेबखाॅं पठाण (अपक्ष), अंकुश रामा खोटे भारतीय जवान किसान पार्टी, अशोक भागोजी थोरात, बहुजन महापार्टी तथा (अपक्ष) म्हणून अर्ज सादर केला. रईसोद्दीन जकीयोद्दीन पठाण (अपक्ष) , सतीष पद्माकर कापसे (अपक्ष), भीमराव जगन्नाथ दळे, अखिल भारतीय परिवार पार्टी, हनुमंत ज्ञानोबा ताकतोडे, बहुजन भारत पार्टी, शरद बहिणाजी कांबळे यांनी दोन अर्ज ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना पार्टी या पक्षाकडून सादर केलेत., मुक्ता भिमराव दळे यांनी दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल ( डीएसपी अधिकारी दल), गफारखान जब्बार खान पठाण यांनी दोन अर्ज अपक्ष म्हणून सादर केलेत. करुणा धनंजय मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून दोन अर्ज दाखल केलेत. विनायक तुकाराम गडदे, (अपक्ष), भीमराव लिंबाजी मुंडे (अपक्ष), वसीम शेख सलीम शेख यांनी बहुजन महापार्टी व (अपक्ष) म्हणून अर्ज सादर केलेत., राजेंद्र अच्युतराव होके (अपक्ष) , बाबासाहेब आबा लंबाटे, राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी महाराष्ट्र राज्य, रविकांत अंबादास राठोड, समनक जनता पार्टी, गोकुळ बापूराव सवासे, (अपक्ष), चंद्रकांत कुमार हजारे, महाराष्ट्र विकास आघाडी, मजहर खान हबीब खान (अपक्ष) , सलीम अल्लाबक्ष सय्यद (अपक्ष), प्रकाश भगवानराव सोळंके (अपक्ष), संजय काशिनाथराव काळे (अपक्ष), नाजेम खान जब्बार खान पठाण (अपक्ष) , ताटे महेंद्र अशोक , आंबेडकरवादी रिपब्लिकन, शेषराव चोखोबा वीर, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी तथा अपक्ष म्हणून उमेदवारी सादर केली. मुबीन जुबेरी झहीर उल अफ्राक (अपक्ष) , हनुमंत ज्ञानोबा ताकतोडे (अपक्ष) , पाराजी तुळशीराम आगे (अपक्ष), शेषेराव चोखोबा वीर, (अपक्ष), यशवंत उत्तरे गायके (अपक्ष), तथा ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाकडूनही उमेदवारी सादर केली. भास्कर बन्सीधरराव खांडे (अपक्ष), दत्ता सुदाम गायकवाड, (अपक्ष), खलील रहीम शेख (अपक्ष), माणिक बन्सी आदमाने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, तेजस अंकुश घुमरे (अपक्ष), अविनाश आत्माराम मोरे, (अपक्ष), सय्यद मिनहाज अली (अपक्ष), गणेश नवनाथ राव करांडे (अपक्ष), सारिका बजरंग सोनवणे, (अपक्ष), नविदोद्दीन मुश्ताक सिद्दिकी (अपक्ष), इनामदार अखिल अहमद शफाओद्दीन (अपक्ष), गंगाधर सिताराम काळकुटे (अपक्ष), देशमुख दत्तात्रय शिवाजी (अपक्ष), अनुरथ सोपानराव वीर (अपक्ष), असे एकूण 55 इच्छुक उमेदवारी 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज सादर केलेत.

दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

🔺आतापर्यंत सादर केलेले नामनिर्देशन अर्ज

यामध्ये कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष), करूणा मुंडे(स्वराज्य शक्ती सेना), हिदायत सादेख अली सय्यद (अपक्ष),अंबादास जाधव (अपक्ष), सादेक हुसेन महम्मद (अपक्ष), संतोष उत्त्म रासवे (अपक्ष), सलाउद्दीन खान पठाण (अपक्ष),गणेश व्यंकटराव कस्पटे (अपक्ष), सादेक इब्राहीम शेख (अपक्ष), अशोक सुखदेव हिंगे (वंचित बहुजन आघाडी), पंकजा गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी चार अर्ज दाखल केले, प्रितम गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले, श्रीराम विठ्ठलराव खळगे (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख(अपक्ष), सुलेमान खैरोद्दीन महमद (अपक्ष),भिमराव जगन्नाथ दळे (अपक्ष),रहेमान बाहोद्दीन सय्यद (अपक्ष), राजेंद्र अच्युतराव होके(अपक्ष), जावेद सिकंदर मोमीन (अपक्ष), लक्ष्मीबाई बाजीराव मोरे (अपक्ष), रविकांत अंबादास राठोड (अपक्ष), देविदास यशवंत शिंदे (अपक्ष), पठाण अमजद जिलानी (अपक्ष), पठाण सरफराज बाबखाँ(अपक्ष), जावेद सलीम सय्यद (टिपू सुलतान पार्टी).
अपक्ष उमेदवार- शेख तौसिफ अब्दुल सत्तार, सादिक इब्राहिम शेख, उदयभान नवनाथ राठोड, शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे, तुकाराम विठोबा उगले, शेख याशेद शेख तय्यब, वचिष्ट उद्धव कुटे, राजेंद्र अच्युतराव ठोके व शितल शिवाजी धोंडरे (दोन अर्ज) .
भारतीय जवान किसान पार्टी (इंडिया) पक्षाकडून अंकुश रामा खोटे यांनी अर्ज दाखल केला.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून बजरंग मनोहर सोनवणे यांनी दोन अर्ज तर सारिका बजरंग सोनवणे यांनी एक अर्ज दाखल केला.