मुंबई ते दानापूर आणि गोरखपूरला उन्हाळी विशेष रेल्वे

उन्हाळी पर्यटन / भ्रमंती 

मनमाड | मुंबई ते दानापूर आणि मुंबई ते गोरखपूर उन्हाळी विशेष वातानुकूलित सेवा 

नाशिक/मनमाड – प्रवाशांची उन्हाळी सुटीमुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे प्रशासनाने मनमाड़मार्गे मुंबई ते दानापूर आणि मुंबई ते गोरखपूर उन्हाळी विशेष वातानुकूलित प्रवासी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भरउन्हाळ्यात प्रवाशांची आरामदायी सोय झाली आहे. या दोन्ही गाड्यांच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघेल. मुंबईहून ३० एप्रिल आणि ४ मे रोजी रात्री ११.२० वाजता सुटणार आहे. दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. दानापूर येथून २ मे आणि ६ मे रोजी दुपारी दीड वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे.