काचीगुड हिस्सार विशेष रेल्वे गाड्यांच्या 18 फेऱ्या

🔺उन्हाळी सुट्टी 🔺उन्हाळी पर्यटन 🔺भ्रमंती 🔺विशेष रेल्वे गाड्या.

🔺दोन मे ते 30 जून या कालावधीत होणाऱ्या फेऱ्या.

नांदेड – उन्हाळी पर्यटन आणि शाळा महाविद्यालयाला लागणाऱ्या सुट्ट्या या दरम्यान होणारे प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे काचीगुडा हिस्सार काचिगुडा अशा विशेष गाडीच्या मी आणि जून महिन्यात 18 फेऱ्यांना मान्यता दिली आहे.

काचीगुडा हिसार विशेष रेल्वे गाडी क्रमांक (०७०५५)  २ मे ते ३०  जून या दरम्यान दर गुरुवारी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि कामारेड्डी, निजामबाद, मुदखेड, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, वडोदरा, अबु रोड, जोधपुर, बिकानेर मार्गे हिसार येथे शनिवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.

त्याचप्रमाणे हिसार ते काचीगुडा दरम्यान गाडी क्रमांक (०७०५६) पाच मे ते ३० जून दरम्यान दर रविवारी हिसार रेल्वे स्थानकावरून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे मंगळवारी सकाळी ७ वाजता ही गाडी पोहोचेल. या रेल्वे गाडीस वातानुकूलित आणि शयनयान स्लीपर श्रेणी मिळून २३ बोगी असणार आहेत.

🔶 नांदेड पनवेल नांदेड विशेष गाडीचे 40 फेऱ्यांना मंजुरी

एकूणच उन्हाळी सुट्ट्यात प्रवाशांचे गर्दीचा फायदा उचलण्याचे धोरण दक्षिण मध्ये रेल्वेने उचलल्याचे दिसून येत आहे गाड्यांची गर्द लक्षात घेता प्रवाशांचे सोयीसाठी नांदेड पनवेल नांदेड या विशेष गाडीच्या चाळीस फेऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे या 40 फेऱ्या साप्ताहिक आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाड्या आहेत. दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड येथून ही गाडी सुटेल आणि नांदेड पनवेल एक्सप्रेस मध्ये २९ एप्रिल आणि १ मे रोजी धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशाणकरिता आरक्षित बर्थ उपलब्ध करण्यात आले आहेत, असे नांदेड विभाग जनसंपर्क विभागाने कळवले आहे.

हुजूर साहेब नांदेड ते पनवेल विशेष रेल्वे क्रमांक( ०७६५२) २२ एप्रिल ते २६ जून दरम्यान दर सोमवारी व बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटेल.

अधिक माहितीसाठी किंवा रेल्वे मार्गातील बदल जाणून घेण्यासाठी रेल्वे स्थानकाशी संपर्क करावा