🔺धार्मिक उपक्रम – 🔺सोमवारी उपनयन संस्कार
सोलापूर / एम एन सी न्यूज नेटवर्क – स्वकुळ साळी (विणकर) समाज श्री जिव्हेश्वर मंडळ सोलापूर यांच्यावतीने समाजातील विविध भागात असणाऱ्या लहान मुलांचा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी सत्यविजय कन्वेशन्स येथे होणार आहे.
श्री जिव्हेश्वर मंडळ सोलापूर यांच्यावतीने होणाऱ्या या उपनयन संस्कार शिबिरात लहान मुलांचा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम श्री विद्यामहायोग परंपरेला अनुसरून असलेला हा उपनयन विधी सद्गुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांच्या दिव्य उपस्थितीत संपन्न होणार आहे. किरण उपाध्ये, व्यंकटेश कुलकर्णी हे उपनयन विधीचे पौरोहित्य काम पाहणार आहे. तसेच बटूंचे केशकर्तन, बटू व उपस्थितांसाठी नाष्टा व चहा त्यानंतर उपनयन संस्कार कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर बटूंचे बेगमपेठ येथे स्वकुळसाळी समाज येथील श्री मारूती मंदिराचे दर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा सोहळा आहे.
हा कार्यक्रम उपनयन संस्कार कार्यक्रम जुना कुंभारी नाका येथील सत्यविजय कन्वेशन्स मल्टीपर्पज हॉल येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वकुळ साळी ज्ञातीचे विठ्ठल मंदिर, जिव्हेश्वर युवती मंडळ, स्वकुळसाळी विणकर समाजसेवा संशोधन न्यास, श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच, स्वकुळ साळी शिक्षण संस्था, जे.जे. प्रतिष्ठान, श्री जिव्हेश्वर महिला मंडळ, भगवान जिव्हेश्वर सह.गृहनिर्माण संस्था, श्री जिव्हेश्वर विश्वस्त मंडळ या सर्व संस्था परिश्रम करत आहेत. सोहळ्याला उपस्थित राहून समाजबांधवांनी बटूंना आशिर्वाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
